Connect with us

Talent Treasure

‘Ghar’: Marathi Poem by Mugdha M. Shinde, Apeejay School, Kharghar

Published

on

घर नाही चार भिंती

घर असते देखण्या कृती ,

घर नाही एक वस्तू

घर म्हणजे आनंदी वास्तू.

घर नाही नुसत्या खोल्या

घरात हव्या भावना ओल्या ,

घरात हवा जिव्हाळा

घर शिक्क्षणाची पहिली शाळा.

घर नाही नुसता पसारा

घर नाही केवळ निवारा ,

घराला असते कहाणी

घराला असतो आपल्या चेहरा.

घर शिकवते पाहायला

चालायला , धावायला ,

घर शिकवते लढायला

 दुःखाचा डोंगर चढायला

घराणे असावे सावधान

घराणे द्यावे समाधान ,

घराणे ठेवावे काळाचे भान

जवळ करावीत नवीन मूल्ये , नवीन ज्ञान.

घरात आईचे अपार कष्ट

आजी सांगते सुंदर गोष्ट ,

घरात आजोबा गपिष्ट  

आईचा हाताचे जेवण चविष्ट.